वेबसाइट तयार करा - भाग १

तुम्ही आतापर्यंत इंटरनेटशी बर्‍यापैकी परिचित झाला असाल . कोणत्याही वस्तूचे मार्केटिंग करायचे असेल तर तुमच्याकडे तुमच्याकडे तुमची वेबसाइट हवीच . परंतु प्रत्येकालाच वेबसाइट बाहेरून तयार करून घेणे परवडणारे नाहीये , म्हणून या "वेबसाइट कशी तयार करावी" ची लेक्चर सीरीस सुरू केली आहे.
वेबसाइट तयार करायचीय ?? ..... तर मग तुम्हाला खालील २ गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

१) डोमेन नाव (Domain Name) - डोमेन नाव म्हणजे तरी काय ?
  1. तुम्ही आतापर्यंत अनेक वेबसाइट पहिल्या असतील . प्रत्येक वेबसाइटला एक नाव असते तर त्या वेबसाइट च्या नावाला "Domain Name" असे म्हणतात.
  2. उदाहरणार्थ - www.google.com , www.yahoo.co.in , www.manase.org . ही काही वेबसाइट ची नावे.
  3. तुम्ही तुमच्या वेबसाइट साठी डोमेन नाव खरेदी करू शकता.
  4. डोमेन नाव तुम्हाला प्रतीवर्षी खरेदी करावे लागते. म्हणजे तुम्ही जर का "abc.com" हे डोमेन नाव खरेदी केले तर तुम्हाला बरोबर एक वर्षानंतर पुन्हा पैसे भरून हे नाव "Renew" करावे लागते.
२) वेब होस्ट (Web Host) - वेब होस्ट म्हणजे तरी काय ?
  1. कोणतीही वेबसाइट वेब होस्ट शिवाय तयार होऊ शकत नाही.
  2. वेबसाइट तयार करायची म्हणजे सर्वप्रथम वेबपेज तयार करणे आले .
  3. "Web Host" म्हणजे थोडक्यात एक कंपनी की जी तुम्ही तयार केलेले वेब पेजेस त्यांच्या कंप्यूटर वर साठवून ठेवते.
  4. थोडक्यात "वेब होस्ट" म्हणजे तुमच्या वेबसाइट च्या Pages ला इंटरनेट व साठवून ठेवण्यासाठी तुम्ही भाड्यानी घेतलेली जागा.
  5. तुम्ही तुमचे वेबपेज त्या कंपनीच्या कंप्यूटर व साठवून ठेवता म्हणून तुम्हाला त्या कंपनीला मासिक / वार्षिक भाडे द्यावे लागते.
  6. हे भाडे तुम्ही "Credit Card" च्या साहाय्याने भरू शकता.
हुश्श..... आतापर्यंत आपण डोमेन नाव म्हणजे काय असते आणि "Web Host" म्हणजे काय ते थोडक्यात पहिले. पुढच्या भागात आपण "डोमेन-नाव" आणि "Web Host" कोणत्या साइट वरुन विकत घ्यायचे आणि कसे घ्यायचे ते पाहु. कोणत्या ही साइट व क्रेडिट कार्ड वापरायचे म्हणजे जरा धास्तीच वाटते म्हणून आपण आता पुढच्या भागात "वेब होस्ट" विकणार्‍या (जागा भाड्याने देणार्‍या) नामवंत कंपन्या कोणत्या त्याचा सुधा एक सर्वे करणार आहोत.

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments :

अभय शेजवळ said...

नमस्कार मी अभय मी नुकताच माझा ब्लोग चालू केला आहे ..आणि मी google च्या aads साठी
प्रयत्न केला होता पण unsupported language मुळे रिजेक्ट झाला मी आपल्या
ब्लोगवर google च्या adds पहिल्या आणि मला आच्छार्य वाटल कि मदतही ब्लोगवर
googly च्या adds आन या बाबतीत मला मदत कराल का गुगल च्या adds
मला हि मझ्या ब्लोग वर लावायच्या आहेत ..आपण नक्कीच मला मदत कराल आशी आशा करतो
abhayshejwal.blogspot.com

Admin said...

सर्वप्रथम अड्सेन्स च्या जाहिराती दाखवण्यासाठी तुमच्या कडे गूगल चे अड्सेन्स अकाउंट हवे. आणि साइट approve होण्यासाठी तुमच्याकडे एखादी इंग्लीश भाषेतील वेबसाइट हवीच. एकदा का अड्सेन्स अकाउंट मिळाले की तुम्ही जाहिराती कोणत्याही साईट वर दाखवू शकता. परंतु साईट ही पूर्णपणे मराठी नसावी. मराठी + English साइट असेल तर अड्सेन्स च्या जाहिराती तुम्ही दाखवू शकता. gavachakatta.blogspot.com ही वेबसाइट पूर्णपणे मराठी नसून काही पोस्ट मराठी आणि इंग्लीश मिश्रित आहेत.