आता कुठे गेले राज ठाकरे? :

                  आता कुठे गेले राज ठाकरे? :       


मुम्बई हल्ला & राज ठाकरे काय सम्बन्ध हे तुम्हीच ठरावा .......


शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2008 रोजी पेपरमध्ये आलेला एक लेख मी खास कापून ठेवला होता ? तो आज माज्या ब्लोग्मध्ये पोस्ट करत आहे .


अरे हे पत्रकार सुद्धा मानवजातीला (अपवाद ) कलंक आहे . वेळ काळ न पाहता आपली फक्त ब्रेअकिंग न्यूज़ बनवण्याच्या भानगडीत असतात .


लेख  वाचा 

     
मुंबई. देशाची आर्थिक राजधानी. महाराष्ट्राची राजधानी. मराठी लोकांचे शहर. हो फक्त मराठी लोकांचे शहर. अजून काय? हो, मुंबईची आणखी एक नवी ओळख राहिलीच. अतिरेक्यांचेही शहर.


मुंबईला आपण आधीच वाटून घेतले होते. चेन्नई तमिळींचे. बंगलोर कन्नडिगांचे. अहमदाबाद गुजरात्यांचे तसे मुंबई  मराठी लोकांची. बिहारी, युपीच्या भय्यांची तर अजिबात नाही. तसा राज ठाकरेंनी परप्रांतीयांना महाराष्ट्रातून हाकलण्याचा विडा उचललाच होता. त्याला तिकडे लालूप्रसाद यादव, अमरसिंह, पासवान यांनीही बोलभांड विरोध केला होता.

हा सगळा संघर्ष मुंबईच्या रस्त्याने काही दिवसांपूर्वीच पाहिला होता. त्यावेळी मुंबई कुणाची? हा प्रश्न चांगलाच गाजला होता. मुंबई मराठी माणसाची, देशवासीयांची, बिहारी, युपीतल्या भय्यांची असे वेगवेगळे सूर निघाले होते?

अतिरेक्यांना हा प्रश्न पडला नाही. त्यांना माहित होते, मुंबई भारताची आहे. तीच हादरवली की मुंबई अतिरेक्यांचीही होऊन जाईल याची खात्रीही होती. म्हणूनच त्यांनी आपसातील भांडणांचा चांगला उपयोग केला नि भारताच्या या नाकावर टिच्चून प्रहार केला. हा प्रहारही एवढा जबरदस्त होता की आपल्याच देशात आपल्याला सैन्याला हेलिकॉप्टरवरून उतरून अतिरेक्यांशी सामना करावा लागला. तीन दिवस या लोकांशी अहोरात्र लढावे लागले तेव्हा कुठे मुंबई ताब्यात आली.

आणि हो मुंबई पोलिसांच्याही परिस्थिती ताब्यात येत नव्हती. तेव्हा उत्तर भारतातल्या दिल्लीहून राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीचे (एनएसजी) 'परप्रांतीय' जवान मुंबई वाचविण्यासाठी धावून आले. राज ठाकरेंची मुंबई या उत्तर भारतीय जवानांनी मुंबई पोलिसांसह लढून 'देशाच्या' ताब्यात राखली. तेव्हा कुठे मुंबई पुन्हा आपल्याला मिळाली.

या सगळ्या हिंसक गदारोळात रस्त्यांवर सैरावैरा धावणार्‍यांत भय्ये, परपरप्रांतीय, उत्तर भारतीय मराठी असा कुठलाही भेद उरला नव्हता. सगळे भारतीय होते. आणि या 'भारतीयांवर' गोळ्या बरसवणारे तेवढे अतिरेकी होते.

हे सगळे होत असताना राज ठाकरे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होते. लालू, नितिशकुमार, अमरसिंह प्रभृतीही आपापल्या घरी शांततेत मुंबई जळताना पहात होते.


या लेखावारिल माजी प्रतिक्रिया :


हा हरामखोर लेखकच पक्का राजकारनी   आहे.जरा बाहेर येउन फिरुन पाहा. पहिलच रक्तदान शिबिर मनसेने सुरु केलेमुबंई मराठी माणसाचीच !! NSG ही उत्तर भारतीयाची आहे हे कोणी सांगतले ?.मुंबई ला धोक्यात कोणी टाकले. ?आतंकवादी हत्यारे धेऊन समुंद्रातुन आले तेव्हा कोस्ट्ल गार्ड व नेव्ही ची माणस काय करत होती. कोस्ट्ल गार्ड व नेव्ही दील्ली च्या सधीपत्यात येतात. कोस्ट्ल गार्ड व नेव्ही मराठी माणसाच्या हातात असती तर हे धड्लेच नसते!!!!! NSG ला पाचारण करण्या आधी 14 मराठी पोलासानी प्राण गमावले , तेव्हा मराठी माणसाने "मराठी " म्हणुन कधीच प्रचार केला नाही. ह्या NSG मधे मराठी माणसे ही होती हे विसरुन चालणार नाही  .तो नितिश कुमार तिथे बसुन फक्त बिहरि लोक जे या हल्ल्यात मरन पावले आहेत त्यानाच दीड लाख देण्याच्या वार्ता कर्तो या लेखकला ज्याने हा लेख् लिहिला आहे.मी फ़क्त एवढेच म्हणेन की हा डोक्यावर पडलाय  बहुतेक नाहीतर  मतिमंद आहे लेखक  .


प्रतिक्रिया कळवा .......



 

About Admin

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments :

Vijay Deshmukh said...

राज ठाकरे कुठे होते ?
ते त्यांच्या कार्यकर्त्यांना रक्त देण्याचे आवाहन करत होते. हे ह्या पत्रकाराला माहीती आहे का ?

kdk said...

raj sahebanchya virodhat he ase lekh lihnaari vyaktich muli marathi nasavi.