वैदिक गणित : ३ अंकी संख्यांचा गुणाकार

वैदिक गणिताच्या पुढील भागात आपले स्वागत आहे . यापूर्वी आपण संख्यांचे वर्ग तोंडी कसे काढावे याबद्दल शिकलो , आज आपण वैदिक गणितात ३ अंकी संख्यांचा गुणाकार तोंडी कसा कराल ते पाहणार आहोत . ( या टूटोरिअल नंतर तुम्ही कोणत्याही संख्येचा गुणाकार तोंडी करू शकाल ) . उदहारण : १३२ X ४५४
गुणाकार करण्यासाठी खलील स्टेप्स पहा >>>
स्टेप १ :
खालील आकृतीतील Arrow पहा , आणि त्यांचा Sequence पहा .
स्टेप २ :
आपण गुणाकार ५ वेळअ  करणार आहोत , प्रथम Black रंगाच्या बानाने दाखविलेल्या संख्यांचा गुणाकार करावा .नंतर मरून रंगाच्या बानाने दाखविलेल्या संख्यांचा गुणाकार करावा आणि अशाप्रकारे गुणाकार करावे . परंतु त्याचे उत्तर मांडताना खालील पद्धतीने मांडावे . पाचवा गुनाकराचे उत्तर प्रथम , चौथ्या गुनाकराचे दुसर्यांदा .....
५ ४ ३ २ १
स्टेप ३  : वरच्या अक्रुतीत दिल्या प्रमाने तुम्ही Black arrow दर्शवीत असलेल्या संख्येंचा गुणाकार करा .
२ X ४ = ८  [ उत्तरात "८" मांडा ] 
( 3 X ४ ) + ( २ X ५ ) = १२ + १० = २२ [ उत्तरात २ मांडा , 2 बाकी आहे ]
( १ X ४ ) + ( ४ X २ ) + (५ X ३ ) + २  = ४ + ८ + १५  + २   = २९  [ उत्तरात ९  मांडा , २   बाकी आहे ]
( १ X ५ ) + ( ४ X ३ ) + २   = ५ + १२ + २    = १९   [ उत्तरात ९   मांडा , १  बाकी आहे ]
(१ X  ४ ) + १ = ५  [ उत्तरात 5  मांडा ]
आणि उत्तरे खालून पासून वर पर्यंत मांडा . तुमचे उत्तर [ ५९९२८ ] असेल .

जरी वर दिलेली पद्धत तुम्हाला अवघड वाटली तरीसुधा २-३ उदाहराने सोडवल्यावर तुम्हाला ही पद्धत सोपी वाटेल .

About Pritesh Taral

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments :

साधक said...

आभारी आहे पण तुमच्या तक्त्यात काही चुका आहेत किंवा मला ते समजले नाही.

१.( १ X ४ ) + ( ४ X २ ) + (५ X ३ ) + २ = ४ + ८ + ३(इथे ३ कुठून आले १५ हवेत ना )+२ कुठे गेले = १५ // ithe 17 havet? मग उत्तरात ९ का मांडा ?


२.
( १ X ५ ) + ( ४ X ३ ) + २ = ५ + १२ + १(इथे एक कसा येईल? २ हवेत ना?)=१९ हे बरोबर आहे.

Pritesh Taral said...

अगदी बरोबर !!! धन्यवाद चुक लक्षात आणुण दिल्याबद्दल , कारण सुरुवातीला मी दुसरे उदहारण घेतले होते परंतु नंतर उदहारण बदलले , त्यामुले ते तेवढे राहून गेले !!!